Chinchwad news: सायबर क्राईम बाबत जागरूकता गरजेची – कृष्ण प्रकाश

एमपीसी न्यूज : सायबर क्राइम झपाटयाने वाढत आहे. त्यासाठी सर्वच पातळीवर जागृती निर्माण करणे गरजेचे आहे. सायबर क्राइमच्या केसेस हाताळताना पोलिसांना सायबर क्राइम, फॉरेन्सिक शिकणे गरजेचे आहे. यासाठी सायबर क्राईम एक्सर्पटची पोलिसांना खूप गरज आहे. सायबर गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना, त्याबद्दल जागरूकता  निर्माण करणे गरजेचे आहे, असे मत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी व्यक्त केले.

चिंचवड येथील सुमित ग्रुप ऑफ कंपनीतर्फे सीएसआर अंतर्गत पोलिसांना रुग्णवाहिका देण्यात आली. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे रुग्णवाहिकेची चावी सुपुर्द करण्यात आली. डिजिटल टास्क फोर्स आणि सुमीत ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने सायबर क्राईमचा तपास, सुरक्षा याबाबत चिंचवड येथील कुणाल प्लाझा येथे देण्यात येणा-या प्रशिक्षणाचा शुभारंभही प्रकाश यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. यावेळी उपमहापौर केशव घोळवे सुनील पिंजण,  प्रभाकर साळुंखे, ब्रिगडीयर महेश इराणा (निवृत्त), कायदेतज्ज्ञ नंदू फडके आदी उपस्थित होते.

औद्योगिक क्षेत्राने पोलिसांसोबत एकत्रित काम केले पाहिजे. एक जिद्दीने एक संकल्प करुन काम करणे आवश्यक आहे. सुमित ग्रुपने पोलिसांना सीएसआर अंतर्गत  रुग्णवाहिका दिली आहे. बेवारस मृत देहाची विल्हेवाट लावताना रुग्णवाहिकीचे पोलिसांना मोठी मदत होणार आहे.

बेवारस मृत देहाची विल्हेवाट लावताना पोलिसांना खूप साऱ्या अडचणींना सामोरे जावे लाग होते. सोईसुविधाच्या अभावी अपघातजन्य परिस्थिती हाताळताना आम्ही हतबल होतो. कंपनीतर्फे रुग्णवाहिके सोबत प्रशिक्षित दोन चालक, इंधनाचा खर्चही  दिला जाणार आहे. ही सुविधा चोवीस तास सुरू असणार आहे. रुग्णवाहिकेवर पोलिसांचाच संपर्क क्रमांक दिला जाईल. अपघातावेळी रुग्णवाहिकेचा मोठा फायदा होईल, असे आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले.

कायदेतज्ज्ञ नंदू फडके म्हणाले, सायबर क्राईम अतिशय धोकादायक आहे. प्रत्येकजण आपल्या उपजीविकेसाठी काम करत काटकसर करून पुंजी बँकेत ठेवतो. पण, हॅकर एका क्लिकवर पैसे घेवून जातो. सायबर क्राइमचे चोर उच्चशिक्षित असतात. त्यामुळे आपण त्यांच्यापेक्षा हुशार होणे आवश्यक आहे. नागरिकांनी सायबर सुरक्षिततेबाबत जागृत होणे गरजेचे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.