Cyber Alert : ‘तुमचा मोबाईल क्रमांक अवैध कृत्यासाठी वापरला जातोय…’ अशा मेसेज आणि कॉल्स पासून सावधान

एमपीसी न्यूज – ‘तुमचा मोबाईल क्रमांक अवैध कृत्यासाठी वापरला (Cyber Alert)जातोय’ असे सांगून पैसे उकळणाऱ्या मेसेज आणि कॉल्स पासून सावध रहा. तसेच अशा क्रमांकाबाबत तत्काळ सायबर सेलकडे तक्रार करा, असे आवाहन दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) केले आहे.

दळणवळण मंत्रालयाच्या दूरसंचार विभागाने नागरिकांना बनावट (Cyber Alert)कॉल्स न घेण्यासाठी एक मार्गदर्शक नियमावली जारी केली आहे, ज्या कॉलद्वारे नागरिकांना फोन करणाऱ्यांकडून त्यांचा मोबाईल क्रमांक खंडित करण्याचा किंवा त्यांच्या मोबाईल क्रमांकाचा इतर कोणत्यातरी अवैध कृत्यांसाठी वापर केला जात असल्याचा इशारा दिला जातो आणि त्यानंतर आर्थिक आणि अन्य प्रकारची फसवणूक केली जाते.

आपण सरकारी अधिकारी असल्याचे भासवणाऱ्या आणि लोकांना फसवणाऱ्या परदेशी मूळ स्थान असलेल्या मोबाईल क्रमांकांवरून (+92 या क्रमांकाने सुरु होणाऱ्या) येणाऱ्या व्हॉटसऍप कॉलबाबतही दूरसंचार विभागाने एक नियमावली जारी केली होती. अशा प्रकारच्या कॉलच्या माध्यमातून सायबर गुन्हेगार घाबरवण्याचा किंवा सायबर गुन्हे/आर्थिक गुन्हे करण्यासाठी वैयक्तिक माहिती चोरण्याचा प्रयत्न करत असतात. दूरसंचार विभाग / ट्रायकडून त्यांच्या वतीने अशा प्रकारचे कॉल करण्याचे अधिकार कोणालाही दिलेले नाहीत.

Pune : पुण्याच्या माजी महापौर रजनी त्रिभुवन यांचे निधन

नागरिकांनी दक्ष रहावे आणि अशा बनावट कॉलची तक्रार संचारसाथी (www.sancharsaathi.gov.in/sfc) या पोर्टलवर चक्षू म्हणजे या बनावट कॉलची तक्रार करण्याच्या सुविधेअंतर्गत करण्याची सूचना ट्रायने केली आहे. जर आधीच एखादी व्यक्ती सायबर गुन्हे किंवा आर्थिक फसवणुकीची बळी ठरली असेल तर त्यांनी सायबर गुन्हे हेल्पलाईन क्रमांक 1930 किंवा www.cybercrime.gov.in येथे तक्रार दाखल करण्याची सूचना देखील दूरसंचार विभागाने केली आहे.

चक्षू सुविधे अंतर्गत बनावट आणि फसवणूक करणारे एसएमएस नागरिकांना पाठवण्यात सहभाग असलेल्या 52 प्रमुख आस्थापनांना ट्रायने काळ्या यादीत टाकले आहे. 700 एसएमएस कंटेंट टेम्प्लेट निष्क्रीय करण्यात आले आहेत. सर्व दूरसंचार ऑपरेटर्स अंतर्गत संपूर्ण भारतभरात 348 मोबाईल हँडसेट काळ्या यादीत टाकले आहेत.

10 हजार 834 संशयित मोबाईल क्रमांक पुनर्पडताळणीसाठी चिन्हांकित करण्यात आले आहेत, ज्यापैकी 30 एप्रिल 2024 पर्यंत पुनर्पडताळणी करू न शकलेले 8272 मोबाईल कनेक्शन खंडित करण्यात आले आहेत. सायबर गुन्हे/ आर्थिक गुन्हे यामध्ये सहभागी असल्याबद्दल संपूर्ण भारतभरात 1.86 लाख मोबाईल हँडसेट्स ब्लॉक करण्यात आले आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.