Pune : कॉसमॉस बँक सायबर हल्ला प्रकरण ; आतापर्यंत सात जणांकडून साडेतीन लाखांची वसुली

एमपीसी न्यूज – पुण्यातील कॉसमॉस बँकेच्या मुख्यालयावर झालेल्या सायबर हल्ल्यात जवळपास 94 करोड रुपयांची चोरी करण्यासाठी चोरट्यांनी महाराष्ट्रातील तब्बल 428 एटीएम कार्ड्सचा वापर करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

मिऴालेल्या माहितीनुसार, पुण्यातील गणेशखिंड रस्त्यावर असलेल्या कॉसमॉस बँकेचे मुख्यालयातील एटीएम स्वीच (सर्व्हर) हॅक करून अज्ञात व्यक्तीने बँकेच्या व्हिसा व रुपी डेबिट कार्ड धारकांची माहिती चोरून भारतासह 29 देशातील एटीएमच्या मदतीने 94 करोड 42 लाख रुपये काढले आहेत. ही रक्कम लंपास करण्यात महाराष्ट्रातील 428 एटीएम कार्ड्स तर केवऴ पुण्यातील 171 एवढे एटीएम कार्ड्स वापरण्यात आल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी केलेल्या आतापर्यंतच्या तपासामध्ये सात जणांकडून 3 लाख 55 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. पुण्यातील एकाने 16 हजार तर नंदुरबार येथील एकाने 99 हजार रुपये पोलिसांकडे जमा केले आहेत.

या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी एसआयटीची स्थापना केली असून एसआयटीने केलेल्या आतापर्यंतच्या तपासात भारतातील 41 शहरातील 71 बँकांच्या एटीएममधून अडीच कोटी रुपये काढल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील गुन्हेगारांना पकडण्याचे मोठे आवाहन पोलिसांसमोर आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.