Cyber Crime : सायबर गुन्ह्यांत महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर, मुंबई शहर देशात दुसरे

एमपीसी न्यूज – देशातील गुन्हेगारीचा लेखाजोखा मांडणारा ‘क्राइम इन इंडिया 2019’ हा अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. लाॅकडाऊन कळात देशात सायबर गुन्ह्यांमध्ये वेगाने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. देशात सर्वाधिक सायबर गुन्हे कर्नाटकात दाखल झाले असून महाराष्ट्र सायबर गुन्ह्यांत तिसऱ्या स्थानावर आहे. तर, मुंबई शहर देशात दुसऱ्या स्थानावर आहे.

‘क्राइम इन इंडिया 2019’ हा अहवालानुसार, देशात 2019 मध्ये 51 लाख 56 हजार 172 एकूण गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये 44 हजार 556 सायबर गुन्हे आहेत. देशात 2018 मध्ये 27 हजार 248 सायबर गुन्हे घडले होते.

_MPC_DIR_MPU_II

या वर्षी 63 टक्क्यांनी सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहेत. सायबर गुन्ह्यात सर्वाधिक गुन्हे (26,891) हे फसवणुकीच्या उद्देशाने झाले आहेत. यामध्ये डेबिट, क्रेडिट कार्ड, ऑनलाइन फसवणुकीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. त्यानंतर लैंगिक छळाच्या उद्देशाने दोन हजार 266 दाखल झाले आहेत.

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम 188 नुसार 2 लाख 75 हजार 990 गुन्हे दाखल झाले आहेत. 39 हजार 39 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.

तसेच विविध गुन्ह्यांसाठी 29 कोटी 66 लाख 18 हजार 532 रु. दंड आकारण्यात आला आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.