Cyber Crime : सोशल मिडीयावर महिलेचे खाजगी फोटो व्हायरल; तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – महिलेच्या संमतीशिवाय तिचे खाजगी फोटो एका तरुणाने सोशल मिडीयावर (Cyber Crime) व्हायरल केले. याप्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. ही घटना 12 मे ते 23 मे या कालावधीत काळेवाडी येथे घडली.

पिडीत महिलेने याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मनोज उर्फ मानिकांत उर्फ मन्या सुरेश बंडगर (वय 27, रा. थेरगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

Rape Case in Marunji : कोल्डड्रिंकमध्ये गुंगीकारक औषध देऊन तरुणीवर बलात्कार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने 12 मे ते 23 मे या कालावधीत फिर्यादी (Cyber Crime) यांचे खाजगी फोटो सोशल मीडियाद्वारे फिर्यादी आणि त्यांच्या नातेवाईकांना पाठवले. फोटो व्हायरल करून फिर्यादी यांची बदनामी आणि विनयभंग केला. आरोपीने फिर्यादी यांच्या नातेवाईकांना जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.