Cyber security : ‘थांबा, ‘कट्यार’ खिशात घुसू देऊ नका’, असं ‘कोण’ ‘कोणा’ला म्हणतंय?

Cyber Security: 'Wait, don't let 'Katyar' get in your pocket', who said to whom?

एमपीसी न्यूज – सध्या लॉकडाउनमुळे जो तो आपापल्या घरातच होता. त्यामुळे चो-यांचे प्रमाण कमी झाले होते. मात्र ऑनलाईन व्यवहार वाढल्यामुळे सायबर क्राइमचे प्रमाण वाढले होते. या वाढत्या सायबर क्राइमला पायबंद घालण्यासाठी महाराष्ट्र पोलिस वेगवेगळी शक्कल लढवत आहेत.  नागरिकांना या गुन्ह्यांविषयी जागरुक होण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी भन्नाट ट्विट केलं आहे.

आजकाल मीम्सचा जमाना आहे. त्यामुळे याच माध्यमातून लोकजागृती करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटातील एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट पाहिल्यानंतर अभिनेता आणि या चित्रपटाचा निर्माता सुबोध भावेने ट्विट करत पोलिसांच्या या कामाचं कौतुक केलं आहे. तसंच त्यांचे आभारही मानले आहेत.

‘सायबर गुन्ह्याची ‘कट्यार’ तुमच्या अकाउंटमध्ये घुसू देऊ नका! जेव्हा तुम्हाला कोणी- ‘वेगवेगळ्या अकांऊटचे पासवर्ड वेगळे आहेत ना?’ असं विचारतं, तेव्हा अभिमानाने ‘खाँ साहेबांसारखं’ उत्तर द्या…बेशक हमारे पासवर्ड का कोई सानी नहीं. बहुत ही बुलंद और बेमिसाल हैं हमारा पासवर्ड’, असं ट्विट महाराष्ट्र पोलिसांनी शेअर केलं होतं.

त्यांचं हे ट्विट पाहिल्यानंतर सुबोध भावेने तात्काळ त्यावर रिट्विट केलं आहे. ‘वाह वाह महाराष्ट्र पोलीस… तुमच्या कल्पना निरागस सुरांसारख्या आहेत… आपल्या सुरक्षित हातांमध्ये महाराष्ट्राचं मनमंदिर तेजाने उजळून निघू दे’, असं रिट्विट सुबोधने केलं आहे.

सोशल मीडियावर सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या या ट्विटची चर्चा रंगली आहे. महाराष्ट्र पोलीस कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून जनेतला सुरक्षित राहण्याचं आणि सजग राहण्याचं आवाहन करत असतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.