Pimpri News : कृषी कायद्यांविरोधातील सायकल रॅलीचे पिंपरीत स्वागत

एमपीसी न्यूज: केंद्राने आणलेल्या सुधारित कृषी कायद्यांच्या विरोधात ( oppose the amended agricultural laws) देशव्यापी आंदोलन सुरू आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी माजी केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( sharad Pawar )  यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईमधील आझाद मैदानात 23, 24 व 25 रोजी आंदोलन ( Agitation) होणार आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुण्याहून मुंबईकडे निघालेल्या सायकल रॅलीचे (cycle rally) पिंपरी येथे विविध सामाजिक संघटनांच्यावतीने स्वागत करण्यात आले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, ‘शेकाप’च्या छाया डिस्ले, सचिन आल्हाट यांच्यासह पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघ, अंधश्रद्धा निर्मूल समिती, आम आदमी पक्ष, शेकाप, युवक कॉंग्रेस, अशा विविध पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते. ‘मोदी सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय’, ‘अरे हे सरकार करतय काय, दलाली करतय दुसरं काय’, अशा घोषणा उपस्थितांकडून देण्यात आल्या.

ही सायकल रॅली पुण्यातील सारसबागेपासून निघाली असून वाटेत इतर नागरिक या रॅलीत सामील होणार आहेत. देहूरोड, तळेगाव, कामशेत, लोणावळा येथे रॅलीशी अनेककार्यकर्ते आणि शेतकरी संलग्न होणार आहेत. लोणावळ्यामध्ये रॅलीचा आज मुक्काम असून, उद्या ही रॅली नागोठण्यामध्ये असणार आहे.

नागोठण्याहून ही रॅली पुढे पनवेल, वाशीमार्गे रविवारी २४ तारखेला सायंकाळी ४.३०ते ५ च्या दरम्यान आझाद मैदानात पोहोचणार आहे. तेथे रॅलीतील कार्यकर्ते आंदोलनात सामील होणार आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.