Talegaon Dabhade : रोटरी सिटीच्या सामाजिक उपक्रमाद्वारे तळेगावच्या वैभवात भर- आमदार बाळा भेगडे

तळेगाव सिटी रोटरी क्लब व तळेगाव सिटी रोट्रॅक्ट क्लब याचे संयुक्त विद्यमाने सायकल रॅली

एमपीसी न्यूज- रोटरीचे काम हे समाजाच्या हिताचे चालले असून आरोग्य शिबीर,शैक्षणिक,क्रीडाविषयक,सांस्कृतिक,धार्मिक,सामुदायिक विवाह असे समाजाच्या हिताचे व गोरगरिबांना मदतीचा हात देणारे उपक्रम तळेगावच्या वैभवात भर घालणारे आहेत असे प्रतिपादन आमदार बाळा भेगडे यांनी केले.

आरोग्य संवर्धन, वाहतुक सुरक्षा जागृती, पर्यावरण संवर्धन जागृती, स्वच्छ तळेगाव सुंदर तळेगाव इ.संदेश मावळ पंचक्रोशीतील जनमानसात रुजविण्यासाठी रविवारी (दि. 10) रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी व रोट्रॅक्ट क्लब ऑफ तळेगाव सिटी याचे संयुक्त विद्यमाने काढण्यात आलेल्या सायकल रॅलीचे उदघाटन करताना ते बोलत होते.

यावेळी नगराध्यक्षा चित्राताई जगनाडे,मावळ पंचायत समितीचे उपसभापती शांताराम बापू कदम, उपनगराध्यक्ष संग्राम काकडे, क्रीडाप्रेमी नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

मारूती मंदिर चौक तळेगाव दाभाडे येथून बाजारपेठेतून स्टेशन चौक मराठा क्रांती चौक,शिवाजी चौक ते पुन्हा गाव पाच कि.मी.च्या सायकल रॅलीद्वारे पर्यावरण जागृती संदेश जनमानसात पोहोचवण्याचे काम केले. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना 800 टी शर्ट संस्थापक अध्यक्ष रो.विलास काळोखे यांनी दिली असून सर्वांच्या अल्पोपाहाराची व्यवस्था उपाध्यक्ष रो.मनोज ढमाले यांनी केली.

रोटरीच्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर(2021)च्या रो. रश्मी कुलकर्णी यांनी तळेगाव सिटीच्या कामाचे कौतुक करताना तळेगावच्या प्रचंड कडाक्याच्या थंडीत 800 विद्यार्थी उपस्थित राहिल्याबद्दल विशेष कौतुक केले.

प्रोजेक्ट चेअरमन सेक्रेटरी रो.संतोष शेळके, को.चेअरमन रो. दीपक फल्ले, शरयु देवळे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थापक अध्यक्ष रो.विलास काळोखे, ज्येष्ठ मार्गदर्शक रो.दिलीपभाई पारेख, रो.सुरेश शेंडे, रो.भगवान शिंदे, रो.बाळासाहेब रिकामे, रो.बाळासाहेब भेगडे, रो.तानाजी मराठे, रो.निलेश गराडे ,रो.प्रदीप टेकवडे, रो.विश्वास कदम, रो.सविता करणकोट, रो.शाहीन शेख, रो.वैशाली खळदे, रो.उज्ज्वला साळुंखे, रोट्रक्ट अध्यक्ष केशव मोहोळ-पाटील, उपाध्यक्ष यशवंत दाभाडे, सचिव प्रतीक माने यांनी विशेष परिश्रम घेतले.

तीन भाग्यवान विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सायकल वाटप करण्यात आले. रिसायकल उपक्रमातून 10 गरीब मुलांना मोफत सायकली देण्यात आल्या या उपक्रमामुळे रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी व रोट्रॅक्ट क्लब ऑफ तळेगाव सिटीचे पंचक्रोशीतील नागरिक कौतुक करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.