World Anti-Drug Day 2022 : जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त व्यसनमुक्ती केंद्रापर्यंत सायकल फेरी

एमपीसी न्यूज – संपूर्ण भारतामधील क्रीडा आणि आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणारे इन्डो अथलेटिक्स सोसायटीतर्फे जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त (World Anti-Drug Day 2022) पुणे ते लोणावळा अशी शंभर किलोमीटर सायकल फेरी काढून तिची सांगता लोणावळा येथील डॉन बॉस्को पाऱ्य आशियाना व्यसनमुक्ती केंद्र येथे करण्यात आली.

या कार्यक्रमाचे  (World Anti-Drug Day 2022) नेतृत्व रमेश माने व सुशील मोरे यांच्यातर्फे करण्यात आले. सर्व सायकलपटू सोमवारी सकाळी पाच वाजता निगडी येथील भक्ती-शक्ती येथे जमले होते. निगडी सोमटणे फाटा तळेगाव वडगाव कामशेत लोणावळा असे तब्बल शंभर किलोमीटरचा अंतर पार करण्यात आले. आयएएसचे गणेश भुजबळ आणि अजित पाटील यांच्या तर्फे झेंडा दाखवण्यात आला.

Pune Accident News : पुण्यात सिंहगड, विमानतळ आणि लोणीकंद परिसरातील रस्ते अपघातात तिघांचा मृत्यू

डॉन बोस्को व्यसनमुक्ती केंद्राचे देवदास जेवियर यांनी सर्वांना मार्गदर्शन केले आणि संस्थेच्या कार्याची माहिती दिली. एखाद्या व्यक्तीला व्यसनमुक्त करणे खूप मोठी जबाबदारी आहे असे इंडो अथलेटिक्स सोसायटीचे गजानन खैरे म्हणाले. संस्थेतर्फे डॉन बॉस्को केंद्राला मदत देखील करण्यात आली. तर, अल्पोपहाराची व्यवस्था केंद्रामार्फत करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये गिरीराज उमरीकर, श्रीकांत चौधरी, अविनाश चौगुले, प्रतीक पवार, विजय शेटे, अविनाश अनुशे, शंकर उनेचा,नागेश सालेइन यांनी महत्त्वाची भूमिका बजाविली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.