Pune News : संगम पुलावर अज्ञात वाहनाच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज : अज्ञात वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका 45 वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाला.  संगम ब्रिज जवळ 17 जानेवारी च्या रात्री 10 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. किशोर मारुती रोकडे (वय 45) असे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस फौजदार गोविंद शिंगाडे यांनी फिर्याद दिली असून अज्ञात वाहन चालकांविरोधात खडकी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 जानेवारीच्या रात्री दहा वाजण्याच्या सुमारास किशोर रोकडे हे सायकलने संगम ब्रिज परिसरातून जात होते. यावेळी अज्ञात वाहनाने त्यांच्या सायकलला जोराची धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या रोकडे यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर उपचार सुरू असताना 27 जानेवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.

खडकी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून त्या अज्ञात वाहन चालकाचा शोध सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.