Pune : सायकलपटू प्रवीण ताकवले याचा ट्रकच्या धडकेत मृत्यू

काश्मीर ते कोल्हापूर सायकल भ्रमंती मोहिमेदरम्यान राजस्थानला असताना घडली दूर्घटना

एमपीसी न्यूज – काश्मीर ते कोल्हापूर सायकल भ्रमंती मोहिमेसाठी गेलेले पुण्याचे सायकलपटू प्रवीण ताकवले (वय 30, रा. खडकवासला) याचा ट्रकने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मंगळवारी (दि. 21) राजस्थान येथील नागौर-जोधपूर
राष्ट्रीय महामार्गावरील नागौर गावाजवळ घडली. 

 

मिळालेल्या माहितीनुसार प्रवीण ताकवले हे काश्मीर ते कोल्हापूर या सायकल भ्रमंती मोहिमेदरम्यान राजस्थान येथे गेले होते. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत 13 ऑगस्ट रोजी काश्मीर ते कोल्हापूर सायकल मोहिमेला सुरुवात केली होती. या मोहिमेत एकूण आठ सायकलस्वार सहभागी झाले होते.

दरम्यान, नागौर गावाजवळ एका हॉटेलमध्ये जेवण करून ते आपल्या सहकाऱ्यांसोबत पेट्रोल पंपावर ठेवलेल्या सायकली घेण्यासाठी चालत जात असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटलेल्या एका भरघाव ट्रकने या चौघांना पाठीमागून धडक दिली. या दुंर्घटनेत ताकवले हे जागीच ठार झाले व तिघेजण जखमी झाले. पोलिसांनी जखमींना खिवसर इस्पितळात दाखल केले आहे. सायकलप्रेमी ताकवले खडकवासला ते शनिवारवाडा ऑफिसला सायकलने येत असत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.