Cyclone Amphan: पंतप्रधान मोदी आज करणार अम्फन चक्रीवादळग्रस्त भागांची हवाई पाहणी

Cyclone Amphan : PM Modi will do Aerial survey of Amphan cyclone-affected areas in West Bengal & Odisha

एमपीसी न्यूज – अम्फन चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शुक्रवारी) पश्चिम बंगाल आणि ओदिशाला भेट देणार आहे. अम्फन चक्रीवादळाने पश्चिम बंगाल व ओदिशा या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विध्वंस केला आहे. त्याची हवाई पाहणी पंतप्रधान करणार आहेत. त्यानंतर ते मदत आणि पुनर्वसनासाठी या पॅकेज जाहीर करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने काल रात्री ही घोषणा करण्यात आली. अम्फन चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही भेट महत्त्वपूर्ण मानली जाते. या चक्रीवादळाने 72 जणांचा बळी घेतला असून मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पश्चिम बंगालचे एक लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक मोठे नुकसान झाल्याचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान आज पश्चिम बंगाल आणि ओदिशाला भेट देणार असल्याचे पंतप्रधान कार्यालयाच्या ट्वीटमधे म्हटले आहे. पंतप्रधान संबंधित भागाची हवाई पाहणी करणार असून आढावा बैठकाही घेणार आहेत यामध्ये  मदत आणि पुनर्वसनावर चर्चा होईल, असे शासकीय प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.