Cyclone Gulab : ‘गुलाब’ चक्रीवादळामुळे राज्यात बरसणार पाऊस

एमपीसी न्यूज : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. या चक्रीवादळामुळे राज्यात पुढील 3 ते 4 दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर आज संध्याकाळी आंध्रप्रदेश, ओडिशा किनारपट्टीवर गुलाब नावाचं चक्रीवादळ धडकेल.

‘गुलाब’ चक्रीवादळाचा थेट परिणाम राज्यावरही जाणवू शकतो. तर राज्यात पुन्हा पाऊस सुरू झाला आहे. यंदा राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या श्रेणीमध्ये किंवा अधिक पाऊसाची नोंद झाली आहे.

हवामानशास्त्र विभागाच्या म्हणण्याप्रमाणे, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यात मान्सून सक्रीय राहणार आहे. राज्यातील नागरिकांना ऑक्टोबरमध्येही पावसाला सामोरं जावं लागणार आहे. तर 5 ऑक्टोबरनंतर मॉन्सूच्या माघारीची प्रक्रिया सुरू होणार आहे.

मुंबई आणि पुण्यातून मान्सूनच्या माघारीची तारीख 8 ते 9 ऑक्टोबरच्या आसपास असते. यंदाही याच काळात मॉन्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.