Nisarga Cyclone Update: महाराष्ट्रात उद्या ‘निसर्ग’ धडकणार; एनडीआरएफच्या तुकड्या तैनात

Cyclone Nisarga Tomorrow in Maharashtra Coasts, Alert issued Heavy Rains possibility In Mumbai

एमपीसी न्यूज- अरबी समुद्रातील ‘निसर्ग’ चक्रीवादळ महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातच्या दिशने सरकत आहे. ते आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.  3 जूनला (बुधवार) ते दोन्ही राज्यांत धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुसळधार पाऊस पडू शकतो. याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राच्या किनारपट्टीला बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, सोमवारी ठरल्यावेळी एक जूनला मान्सून केरळात दाखल झाला आहे.

सोमवारी (दि.1) मुंबईत पाऊस झाला. दरम्यान, महाराष्ट्रातील मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे एनडीआरएफची 9 पथके तैनात आहेत. गुजरातने सुरत, भरुच, नवसारी, वलसाड, भावनगर, अमरेली आणि डांग जिल्ह्याच्या सखल भागात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित जागी जाण्याचा आदेश दिला आहे. तिथे एनडीआरएफची 10 पथके तैनात करण्यात आली आहेत.


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, एनडीआरएफ, आयएमडीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.


निसर्ग चक्रीवादळ मंगळवारी रात्री 11.30पर्यंत तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होईल. त्यानंतर 3 जूनला रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर आणि दमणदरम्यानच्या पट्ट्यात त्याचा प्रवेश होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.