Cylinders Rate Update: पुण्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 11.50 रुपयांची वाढ

Cylinders Rate Update In Pune the price of domestic gas cylinder has been increased by Rs 11.50

एमपीसी न्यूज- आंतरराष्ट्रीय बाजारात स्वयंपाकाच्या गॅसच्या (एलपीजी) किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे इंडियन ऑईल कॉर्पोरेशन आणि इतर सरकारी ऑईल कंपन्यांनी देशांतर्गत बाजारात एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत वाढ केल्याची घोषणा केली आहे.  आजपासून देशभरात विनाअनुदानित गॅस सिलिंडर 11.50 रुपयांनी महागला आहे. तर व्यावसायिक वापराचा गॅस सिलिंडर 100 रुपयांनी महागला आहे. त्यामुळे पुण्यात  सिलिंडरच्या दरात 11.50 रुपयांची वाढ झाली आहे. 

मे महिन्यात पुणे शहरात गॅस सिलिंडर 582 रुपयांना मिळत होता. जून महिन्यात त्यात 11.50 रुपयांची वाढ झाली असून तो 593.50 रुपयांना मिळेल. नवे दर 1 जूनपासून लागू झाले आहेत. दरम्यान, व्यावसायिक वापराच्या 19 किलोच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 110 रुपयांची वाढ झाली आहे. मुंबईत 19 किलोचा गॅस सिलिंडर 1087.50 रुपयांना मिळणार आहे.

एप्रिलमध्ये कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाल्यामुळे अनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली होती. यापूर्वी मार्च महिन्यात सिलिंडरच्या दरात घसरण झाली होती.


इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने स्पष्ट केले आहे की, स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीतील वाढीचा प्रधानमंत्री उज्जवला योजनेच्या लाभार्थ्यांवर परिणाम होणार नाही. कारण त्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत जूनपर्यंत मोफत एलपीजी सिलिंडर उपलब्ध करुन दिला जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.