D S Kulkarni: कोरोनामुळे मुलीचा मृत्यू, तेराव्यासाठी डीएसकेंना काही तासांची मुभा

डीएसके यांची मुलगी अश्विनी देशपांडे यांच्यावर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात कोरोनावर उपचार सुरु होते. त्याचदरम्यान त्यांचे निधन झाले.

एमपीसी न्यूज- 2000 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी (डीएसके) कारागृहात आहेत. त्यांच्या मुलीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. परंतु, डीएसके त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी आणि मुलगा शिरीष यांना अटकेत असल्यामुळे मुलीच्या अंत्यविधीला उपस्थित राहता आले नाही. न्यायालयाने या तिघांना मुलीच्या तेराव्यासाठी काही वेळ घरी जाण्यास परवानगी दिली आहे.

डीएसके यांची मुलगी अश्विनी देशपांडे यांच्यावर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात कोरोनावर उपचार सुरु होते. त्याचदरम्यान त्यांचे निधन झाले. कारागृहात असलेल्या डीएसके आणि त्यांच्या कुटुंबीयांना अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्याची परवानगी मिळाली नव्हती.

त्यांच्या वकिलांनी तेराव्याला उपस्थित राहण्यासाठी पुन्हा न्यायालयासमोर अर्ज केला होता. न्यायालयाने त्यांची विनंती मान्य केली असून आता 16 ऑगस्टला मुलीच्या तेराव्यासाठी कुलकर्णी दांपत्य आणि मुलगा शिरीष यांना काही तासांसाठी कारागृहातून घरी जायची परवानगी देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.