Akurdi : डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात माहिती तंत्रज्ञान कार्यशाळेत सायबर सिक्युरिटी विषयावर मार्गदर्शन

एमपीसी न्यूज – डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे सहा दिवसांचा शिक्षक प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. यामध्ये सायबर सिक्युरिटी या विषयावर सविस्तर चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले.

हे  प्रशिक्षण कार्यक्रम शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयोगाने पंडित मदनमोहन मालविया राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत राबविण्यात आला. या कार्यक्रमाचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय एम वढाई यांनी केले. यावेळेस विभागप्रमुख डॉ. प्रिती पाटील व विषयतज्ञ अनिकेत बदामी व अमोल बागल आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन आरती गायकवाड यांनी केले.

विषयतज्ज्ञ अनिकेत बदामी यांनी सायबर सिक्युरिटीचे महत्व, आवश्यकता यासह बेसिक नेटवर्किंग, बेसिक लिनक्स, काली लिनक्सची ओळख इथिकल हॅकिंग, माहिती संकलन, स्कॅनिंग, ग्रुप आक्टिविटी, व्हलॅनरबिलिटी असेसमेंट, एक्सएप्लॉयटेशन व पोस्ट एक्सप्लॉयटेशन, क्यायार साइड अटॅक व क्लॅरीग ट्रॅक अटॅक यावर त्यांंनी माहिती सादर केली व मार्गदर्शन केले. या माहितीचा वापर करून आपण सायबर गुन्ह्यापासून सुरक्षित राहून आपले व्यवहार अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळू शकतो.

विषयतज्ज्ञ साहिल गायकवाड यांनी डाटा सिक्युरिटी, ब्राऊजर सिक्युरिटी, मालवेअर सिक्युरिटी, सायबर लॉ ऑफ इंडिया, वेब अप्लिकेशन  असेसमेंट, वर्क सूट इंट्रोड्युक्शन, एस क्यू एल इंजेक्शन, क्रोस साइड स्केर्टींग, फाईल उपलोड एक्क्सपल्डीन्ग, पॅरामीटर टेम्पेरिन्ग, रेट लिमिटिंग सेशन, फिक्सेशन मिक्सड अटॅक या विषयावर प्रकाश टाकला व सविस्तर मार्गदर्शन केले. याचा वापर करून आपण आपली वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेऊ शकतो.

उदा. अँड्रॉइड फोनवरील माहिती, बँके विषयीची माहिती व इतर माहिती सुरक्षित ठेऊ शकतो याचे मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणासाठी विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातील व विभागातील प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. विषयतज्ज्ञ बदामी व बागल यांनी सायबर सिक्युरिटी, हॅकिंग व त्यांचे विविध प्रकार, यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले व त्यांचे प्रात्यक्षिक करून घेण्यात  आले. हा कार्यक्रम शिवाजी विद्यापीठ  कोल्हापूरच्या अनुदान आयोगाच्या करियर अडव्हान्समेंट स्कीम अंतर्गत राबविण्यात आला.  याचा तांत्रिक शिक्षण क्षेत्रात काम करण्याऱ्या सर्व प्राध्यापकांना लाभ झाला. या कार्यक्रमास संस्थेचे व्यवस्थापन व संचालक कर्नल (निवृत्त) एस. के.जोशी, प्राचार्य डॉ. विजय एम वढाई, उपप्राचार्य डॉ. मालती यांचे  मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.