D Y Patil College : डॉ. डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ फार्मसी आकुर्डीचे अकरा विद्यार्थी ‘जीपॅट’ परीक्षेत उत्तीर्ण    

एमपीसी न्यूज : ग्रॅज्युएट फार्मसी अॅप्टिट्यूड टेस्ट (GPAT) ही एम. फार्मा अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परिक्षा आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी 2019 पासून ही परिक्षा घेते. या परीक्षेत आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीचे (D Y Patil College) अकरा विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
या परीक्षेमध्ये श्रुती रेड्डेवार (240), प्रणव शेवकर (343), आकांक्षा पाटील (671), तन्मयी पिंगळे (1022), साक्षी कुंभकर्ण (1324), वैभव वरखडे (1509), कपिल नराळे (1731), अनुजा करवंदे (2506), प्राजक्ता वाघ (3753), अमित जाधव (4954), ऋषिकेश वाघमोडे (40094) यांनी ऑल इंडिया क्रमांक मिळवून यश संपादन केले आहे.

हे सर्व (D Y Patil College) विद्यार्थी ए.आय.सी.टी.ई पोस्ट ग्रॅज्युएशन स्कॉलरशिपला पात्र झाले आहेत. या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर एम. फार्मसीचे शिक्षण घेत असताना दोन वर्षांच्या कालावधीसाठी रुपये 12,400 इतकी प्रती महिना शिष्यवृत्ती मिळते. या विद्यार्थ्यांना सर्व प्राध्यापकांनी मार्गदर्शन केले. तसेच, जीपॅट परिक्षा प्रमुख प्रा. पवनकुमार वानखडे यांनी ही परिक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विषेश तासिका घेतल्या. सराव परिक्षा घेतल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना यश मिळवण्यासाठी मदत झाली, असे विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे प्रभारी संचालक आणि प्राचार्य डॉ. नीरज व्यवहारे, तसेच सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.