Pimpri : रुग्णालयातील स्वच्छता कामगार रुग्णांकडून करून घेतात स्वच्छता (व्हिडीआे)

पिंपरीमधील प्रथितयश मिळवलेल्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार 

एमपीसी न्यूज – डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या बीव्हीजी कंत्राटदाराचे कामगार रुग्णांकडून सफाईची कामे करून घेत आहेत. प्रथितयश मिळवलेल्या रुग्णालय आणि बीव्हीजी कंपनीसाठी ही बाब शोभनीय नाही. तसेच ही बाब रुग्णांच्या आरोग्याशी खेळण्याची आहे. यामुळे  कंत्राटदार बीव्हीजी कंपनीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी डी. वाय. पाटील हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिक्षक यांच्याकडे केली आहे.

पिंपरी येथील डॉ.. डी. वाय. पाटील हॉस्पिटल अॅंड रिसर्च सेंटर हे उपचाराकरिता दररोज अनेक गरीब गरजू रुग्ण येथे दाखल होत असतात. रुग्णालयात स्वच्छता असणे गरजेचे असते. डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयातील साफ सफाई करण्याचे कंत्राट बीव्हीजी या कंपनीकडे आहे. रुग्णालयात उपचार घेण्याकरिता आलेल्या रुग्णांकडून फरशी साफ करुन घेणे ही लाजिरवाणी बाब आहे. बेशिस्त कंत्राटदारांमुळे रुग्णांची पिळवणुक होत असून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत आहे.
https://www.youtube.com/watch?v=wNMnBafW3Lg&feature=youtu.be

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.