Pune : दाभोळकर हत्या प्रकरण : पुनाळेकर यांना सशर्त जामीन मंजूर

एमपीसी न्यूज – डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले सनातन संस्थेचे वकील अॅड. संजीव पुनाळेकर यांना आज (दि.5) पुणे न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.

सीबीआय ऑफिसला दर सोमवारी व गुरूवारी हजर राहणे, परवानगीशिवाय परदेशात जाऊ नये, साक्षीदारावर दबाव आणू नये, सीबीआयने बोलावल्यास हजर राहणे इत्यादी अटींवर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.  न्यायालयात वकील पीपी सूर्यवंशी व आरोपीतर्फे इचलकरंजीकर हजर होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.