Pune : दाभोळकरांच्या पाचव्या स्मृतिदिनी वृत्तपत्र कात्रणांचे प्रदर्शन

एमपीसी न्यूज – डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या पाचव्या स्मृती दिनानिमित्त पुण्यात बालगंधर्व रंग मंदिर येथे वृत्तपत्र कात्रणांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन डॉ. शैला दाभोळकर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी हमीद दाभोळकर, मुक्ता दाभोळकर, मिलिंद देशमुख,  श्रीपाद ललवाणी, नंदिनी जाधव, मुग्धा दाभोलकर, अरुण जाधव आदी उपस्थित होते.  हे प्रदर्शन रविवार आणि सोमवार दोन दिवस खुले असणार आहे.
_MPC_DIR_MPU_II
दरम्यान, डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची हत्या होऊन पाच वर्ष झाली आहेत. प्रदर्शन पाहताना एका ठिकाणी लिहिले होते, ‘मास्टर माईंड शोधला पाहिजे’, हाच प्रश्न पाच वर्ष उपस्थित होत होता. मात्र आता मास्टर माईंड पर्यंत सध्या पोचल्याचे जाणवत असल्याचे प्रतिपादन डॉ. शैला दाभोळकर यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.