DADS : तुम्ही डॉक्टरकडे जाऊ शकत नाही? मग डॉक्टर येतील आपल्या दारी, तेही फक्त 20 मिनिटांत!

एमपीसी न्यूज – लहान मुले, वृद्ध, दिव्यांग व्यक्ती, गरोदर महिला यांना दवाखान्यात घेऊन जाणे बर्‍याचदा गैरसोयीचे असते. रुग्णांना आजारी अवस्थेत घराबाहेर घेऊन जाताना होणारा त्रास, सोबतीला कोणी जबाबदार व्यक्ती, ट्रॅफिक, ऊन-पाऊस असे न टाळता येण्यासारखे अडथळे यासगळ्यावर मात करून रुग्ण उपचारांसाठी डॉक्टरांपर्यंत पोहोचतो. रुग्णांची आणि नातेवाईकांची ही गैरसोय टाळण्यासाठी वॅगमाईन हेल्थकेअर कंपनीने DADS हे मोबाईल ॲप्लिकेशन बनवले आहे. हे ॲप्लिकेशन वापरून आपण गरजेनुसार डॉक्टरांना उपचारांसाठी घरी बोलावू शकता.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, रुग्णाने मागणी नोंदविल्यानंतर अवघ्या 20 मिनिटात डॉक्टर त्यांच्या घरी पोहोचतील. डॉक्टरांकडे आवश्यक औषधे आणि वैद्यकीय चाचण्या करण्याची उपकरणे असतील. ज्यामुळे रुग्णाला लवकरात लवकर उपचार सुरू होतील.

या क्षेत्रातील इतर ॲप्लिकेशन या सर्व सेवा देत नाहीत, काही फक्त औषधे पोहोचवतात, काही डॉक्टरांची वेळ मिळवायला मदत करतात.

DADS मार्फत प्रत्यक्ष डॉक्टर, औषधांसहीत घरी येऊन उपचार देतात, अशी सेवा पुरवणारी ही एकमेव कंपनी आहे.
सध्या DADS ची सेवा पिंपरी चिंचवड शहर व जवळपासच्या परिसरात सुरू करण्यात आली आहे. एका तपासणीचे शुल्क औषधांसह केवळ 200 रुपये असेल.  अतिशय नाममात्र शुल्क आणि तत्पर सेवा यामुळे DADS ला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

हे ॲप्लिकेशन गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल स्टोअरवर उपलब्ध आहे.

संपर्क: 91 68 701 701
DADS ॲप आपल्या मोबाईलमधे इन्स्टॉल करण्यासाठी –
ॲन्ड्राॅईड फोनसाठी  https://play.google.com/store/apps/details?id=com.vagminehealthcare.user
ॲपल आय-फोन साठी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.