Dagadusheth Ganpati: दगडूशेठ गणपती मंदिरात सोमवारी ‘शहाळे महोत्सव’

बाप्पांना दाखवणार पाच हजार शहाळ्यांचा महानैवेद्य

एमपीसी न्यूज –  श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ( Dagadusheth Ganpati ) व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे सोमवारी (दिनांक 16 मे) सकाळी 9 वाजता मंदिरात शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
गणपती बाप्पांना तब्बल 5 हजार शहाळ्यांचा महानैवेद्य अर्पण केला जाणार आहे. वैशाख पौर्णिमेच्या पवित्र दिवशी श्री गणेशाचा पुष्टिपती विनायक जयंती हा अवतार झाला होता.

Uddhav Thackeray : ऐका मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे संपूर्ण भाषण

वैशाख वणव्यापासून तमाम भारतीयांचे रक्षण व्हावे. दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष शेतक-यांच्या समस्या गणरायाच्या कृपेने निर्विघ्न व्हाव्यात, या सद्भावनेने (Dagadusheth Ganpati) शहाळ्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात येणार आहे. तसेच दुस-या दिवशी ससून रुग्णालयातील रुग्णांना शहाळ्यांचा प्रसाद देण्यात येणार आहे.

 

सोमवारी पहाटे 4 वाजता  पंडित सुरेश तळवळकर यांचा स्वराभिषेक कार्यक्रम त्यानंतर गणेशजन्म महाअभिषेक व गणेशयाग होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.