Pune : पहाटे पाच वाजता दगडूशेठ हलवाई गणपतीचे झाले विसर्जन

एमपीसी न्यूज – पुण्यामध्ये मोठ्या उत्साहात लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. पुण्यामध्ये मुख्य आकर्षण असलेला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जनासाठी भव्य दिव्य असा श्री विश्वविनायक रथ तयार करण्यात आला. रात्री 11 वाजून 5 मिनिटांनी दगडूशेठ हलवाई बेलबाग चौकातून मिरवणूकीमध्ये सामील झाला.

विवेक खटावकर यांनी साकारलेला हा मनमोहक रथात श्रीमंत दगडूशेठ विराजमान झाले होते. 27 हजार दिव्यांनी हा रथ उजळून निघाला होता. तब्बल 225 आकर्षक झुंबर रथावर लावण्यात आले होते. या वर्षी चार तास आधीच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक निघाली. पहाटे 4 वाजून 20 मिनिटांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती अलका चौकात आला. तर पहाटे पाच वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.