Rahatani : रहाटणीतील न्यू सिटीप्राईड स्कूलमधील बालचंमूची दहीहंडी उत्साहात

मपीसी  न्यूज – रहाटणी येथील क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले एज्युकेशन फाऊंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड  इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये दहीहंडी उत्सव साजरा करण्यात  आला. स्कूलचे संस्थापक अरुण  चाबुकस्वार यांच्या हस्ते श्रीकृष्णाच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून  पुजा करण्यात आली.

यावेळी विद्यार्थ्यांनी राधा कृष्ण यांचे वेशभूषा धारण करून गोविदा आला रे आला, गोविदा रे गोपाळा या गाण्यावर नृत्य करत दहीहंडीत उत्सवात सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णाच्या बाललीलाबद्दल माहिती सांगीतली. हेमा शेलार,अनिता रोडे आणि प्रियांका लाडे यांनी पाळणा गायला. यावेळी स्कूलचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, मुख्याध्यापिका श्राबानी पत्रानाबिश, शशी जाधव, आनंद शिंदे, प्रियंका दसे, सारिका कोंडाळकर, विद्यार्थ्यी, शिक्षक, पालक, शिक्षकेतर वर्ग यांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या मदतीने दहीहंडी फोडली.

हर्षा पुरोहित आणि राखी पोरेल यांनी  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि शिप्रा हजेला यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.