एम्पीसी न्युज : अग्निवीर आर्मी भरतीसाठी पुणे परिवहन महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) च्या 17 मार्गावरून 120 बसच्या दररोज 1,203 खेपा सुरू होत आहेत.
भारतीय लष्कराच्या वतीने बॉम्बे इंजीनियरिंग ग्रुप, सेंटर खडकी पुणे येथे मंगळवार 6 डिसेंबर 2022 ते 11 डिसेंबर 2022 दरम्यान अग्निवीर आर्मी (महिला मिलिटरी पोलीस) भरती मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. या मेळाव्यासाठी उमेदवार संबंधित घटकांना सोयीस्कर होईल या दृष्टीने बॉम्बे इंजीनियरिंग ग्रुप ( बी.इ.जी), खडकी या ठिकाणापासून सध्या महामंडळाच्या दररोज 17 बस मार्गांवर 120 बसेस धावतात व 1203 खेपा करतात.
संचलन सुरू असलेल्या बसमार्गांची माहिती प्रसारित करण्यात येत असून संबंधित बसमार्गांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे: –
अ.क्र. मार्ग क्रमांक पासून पर्यंत बस संख्या खेपा डेपो वारंवारिता
1 29 बी.आर.टी. स्वारगेट आळंदी 18 174 स्वारगेट 10 मि.
2 11 मार्केटयार्ड पिंपळेगुरव 10 108 मार्केटयार्ड 20 मि.
3 11 अ मार्केटयार्ड कासारवाडी रेल्वे स्टेशन 2 24 मार्केटयार्ड
50 मि
4 119 बी.आर.टी. मनपा भवन आळंदी दर्शन 12 142
न.ता.वाडी 15 मि.
5 152 बी.आर.टी. म.न.पा. भवन लोहगांव मार्गे धानोरी 9
136 न.ता.वाडी 15 मि.
6 99 बी.आर.टी. कोथरूड डेपो विश्रांतवाडी 15 160 कोथरूड
10 मि.
7 99 म तेजस्विनी बी.आर.टी. कोथरूड डेपो विश्रांतवाडी 1
10 कोथरूड 2 तास 30 मि.
8 83 बी.आर.टी. एनडीए गेट नं.10 आळंदी 1 9 कोथरूड 4
तास 15 मि.
9 11 क बी.आर.टी. कात्रज पिंपळेगुरव 1 12 कात्रज 2 तास
30 मि.
10 312 बी.आर.टी. पुणे स्टेशन चिंचवडगांव 6 72 पुणे स्टेशन
25 मि.
11 148 अ हडपसर/भेकराईनगर भोसरी 15 96 भोसरी 25
मि.
12 148 शेवाळवाडी पिंपळेगुरव 12 96 शेवाळवाडी 15 मि.
13 336 बी.आर.टी. वाघोली निगडी 5 40 वाघोली 25 मि.
14 336 बी.आर.टी. वाघोली निगडी 5 40 निगडी 25 मि.
15 311 बी.आर.टी. पिपरीगांव पुणे स्टेशन 2 20 पिंपरी 1
तास 5 मि.
16 337 बी.आर.टी. चिंचवडगांव वाघोली 2 20 पिंपरी 1 तास
30 मि.
17 366 बी.आर.टी. निगडी येरवडा मार्गे पुणे स्टेशन 444
निगडी 35 मि.
महामंडळाच्या सध्या सुरू असलेल्या वरील नमूद 120 बसेसच्या 1203 दररोज खेपांमुळे अग्निवीर आर्मी भरती मध्ये संबंधित प्रवाशांची सोय होणार आहे. तरी संबंधितांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन पीएमपीएमएल कडून करण्यात आले आहे.