Chinchwad : पैशांसह रोजच्या वापरातील कपडेही चोरले

Chinchwad : पैशांसह रोजच्या वापरातील कपडेही चोरीला

एमपीसी न्यूज – सोने-चांदी आणि रोख रकमेसह आता दररोजच्या वापरातील कपडे देखील सुरक्षित ठेवण्याची वेळ आली आहे. कारण चिंचवड येथे एका सोसायटीमधून रोख रकमेसह कपड्यांची देखील चोरी झाली आहे. ही घटना मंगळवारी घडली असून याबाबत शुक्रवारी (दि. 18) निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पुष्पा किशोर बन्सल (वय 45, रा. गगणगिरी सोसायटी, चिंचवड) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बन्सल यांच्या घराचा दरवाजा उघडा असताना दुपारी चार ते रात्री आठ या कालावधीत हा चोरीचा प्रकार झाला. घरातील शांततेचा फायदा घेत चोरट्याने घरातील कपाटातील रोख रक्कम 15 हजार आणि वापरातील 1 हजार रुपयांचे कपडे चोरून नेले. हा प्रकार उघकीस आल्यानंतर बन्सल यांनी शुक्रवारी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून निगडी पोलीस याचा अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.