Dale Steyn retires : दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनची क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती

एमपीसी न्यूज – दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनची क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ट्वीटरवर डेल स्टेनने आपल्या निवृत्तीबाबत आज (मंगळवारी, दि.31) घोषणा केली.

‘मी सर्वांत जास्त प्रेम करत असलेल्या खेळातून आज निवृत्त होतोय, 20 वर्षे सराव, खेळ, प्रवास, विजय, दुखापती, आनंद आणि बंधुत्व यासारख्या अनेक आठवणी आहेत सांगण्यासारख्या. अनेक लोक आहेत, ज्यांना धन्यवाद द्यायचा आहे. सहकारी खेळाडू, चाहते, पत्रकार यासर्वांचे धन्यवाद. हा प्रवास अतिशय सुंदर होता.’ असे डेल स्टेनने ट्वीट केले आहे.

डेल स्टेनची वेगवान गोलंदाज म्हणून ओळख आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेसाठी 93 कसोटीत 22.95 च्या सरासरीने 439 बळी घेतले आहेत. तर, 125 एकदिवसीय सामन्यात 25.95 च्या सरासरीने 196 बळी घेतले आहेत. तसेच T20 मध्ये 47 सामन्यात 64 बळी घेतले आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.