Pune : झाडांवर कु-हाड चालवल्यानंतर मोदींच्या सभेसाठी आता मैदानावर डांबरीकरण!

एमपीसी न्यूज – पुण्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी आधी झाडे तोडली आणि आता चक्क मैदानावरच डांबरीकरण करण्यात आले आहे. 

पुण्यातील स प महाविद्यालयाच्या मैदानावर उद्या गुरुवारी (दि.16) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. त्यासाठी पंतप्रधानाच्या ताफ्याला व्यासपीठापर्यंत जाता यावे, यासाठी डांबरी रस्ता तयार करण्यात आला आहे. याआधी मैदानावर व्यासपीठ तयार करताना 20 ते 25 झाडे तोडली आहेत. त्यामुळे प्रशासनावर चहूबाजूने टीका होत आहे. हा प्रकार घडला असतानाच आता याच मैदानावर डांबरी रस्ता तयार करण्यात आला.

पाऊस आला तर सभेला आलेल्या नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी आधीच भव्य असा अल्युमिनियमचा मंडप उभारण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.