Pune News : दामिनी पथकाकडून 1229 रोडरोमिओ विरोधात धडक कारवाई

एमपीसी न्यूज : रस्त्याने येणार्‍या जाणार्‍या तरुणीचा पाठलाग करून त्यांची छेड काढणाऱ्या रोडरोमियोंना पुणे पोलिसांच्या पथकाने चांगलाच धडा शिकवला. या पथकाने आता पर्यंत 1229 रोडरोमिओंवर कारवाई केली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजाता शानमे यांनी दिली आहे. दामिनी पथकांच्या या कारवाईचे पुणेकरांकडून कौतुक करण्यात येत आहे. 

याविषयी अधिक माहिती देताना सुजाता शानमे म्हणाल्या, दामिनी पथकाने मागील वर्षात शहराच्या अनेक भागात प्रबोधनात्मक कार्यक्रम केले. शहराच्या वेगवेगळ्या भागात 1921 कार्यक्रम घेतले. त्यानंतर पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला 4043 फोन आले. यामध्ये छेडछाडीच्या 1219 घटना घडल्या आहेत. अशा रोडरोमिओवर कारवाई करण्यासाठी दामिनी

पथकाने पुढाकार घेतला होता. यादरम्यान त्यांनी शहरातील अनेक भागात गस्त घातल्या होत्या. अनेक महाविद्यालयाच्या आसपास सापळे रचले होते आणि रोडरोमीओना धडा शिकवला होता.

पुणे पोलिसांच्या महिला सहाय कक्षाकडे अनेक महिला आपल्या तक्रारी घेऊन येतात. यामध्ये सर्वाधिक समस्या या पती पत्नीच्या असतात. परंतु समुपदेशनाच्या माध्यमातून पती-पत्नीतील वाद मिटवण्याकडे आमचा कल असतो. यासाठी आमची 14 जणांची टीम सतत प्रयत्नशील असते. मागील वर्षी पती-पत्नी वादाच्या 2073 तक्रारी आल्या होत्या. त्यातील 807 तक्रारीमध्ये तोडगा निघाला आहे. आत तक्रारकर्ते पती पत्नी एकत्र राहत आहेत, अशी माहिती सुजाता शानमे यांनी दिली.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.