Vadgaon Maval : ओढ्याच्या पूराचा श्री पोटोबा महाराज मंदिराच्या सीमा भिंतीला धोका

एमपीसी न्यूज : वडगाव मावळ येथील ओढ्याच्या पूराच्या पाण्याचा मंदिर प्रांगण सीमा भिंतीला धोका होऊ नये याविषयी उपाय योजना करण्या बाबतच्या मागणीचे श्री पोटोबा महाराज देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर व विश्वस्त सचिव अनंता कुडे व सर्व विश्वस्तांकडून पत्र नगरपंचायतला देण्यात आले आहे.

दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मावळ तालुक्यातील असंख्य भाविक भक्तांचे असलेले श्रद्धास्थान व वडगांवचे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज देवस्थान मंदिरा जवळ असलेले दत्त मंदिर ते श्री पोटोबा महाराज मंदिरापर्यंत वाहत असलेला ओढा आहे.

गेल्या तीन चार दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह ओढ्याच्यावरून रोडवर होत असताना दिसत आहे, भविष्यात मंदिर प्रांगण भिंतीला त्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्याची वेळीच काळजी वडगांव नगरपंचायतने घेऊन, त्यावर उपाय योजना करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

ओढ्याला आलेल्या पूराच्या पाण्यामुळे काही दुर्घटना घडण्यापूर्वी वडगांव नगरपंचायत,नगराध्यक्ष व प्रशासन यांनी वेळीच लक्ष घालुन सदर विषय लवकर मार्गी लावावा असे विश्वस्त मंडळाकडून पत्रात नमूद करण्यात आले आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.