Pune News : दोन वर्षापूर्वी गणपती समोर नाचल्याचा वादातुन जीवघेणा हल्ला

एमपीसी न्यूज : दोन वर्षांपूर्वी गणपती समोर नाचल्याचा वादाच्या रागातून एकावर सुर्‍याने वार करत ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. उत्तम नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सांगरून गावात हा प्रकार घडला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. 

रफिक इब्राहिम पानसरे (वय 50) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी साहिल सादिक पानसरे (वय 21) यांनी उत्तम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी चे वडील आणि आरोपी एकमेकांचे नातेवाईक आहेत. जुन्या दर्ग्याच्या देखभाल घेऊन त्यांच्यात वाद आहेत. दोन वर्षांपूर्वी फिर्यादी यांची बहीण गणपती समोर नाचली होती म्हणून आरोपीने तिला शिवीगाळ केली होती. तेव्हापासून त्यांच्यात वाद होते.

दरम्यान शनिवारी सायंकाळी गावात एक लग्नाची वरात सुरू होती. फिर्यादीची वडील ही वरात पाहत उभे असताना आरोपीने हातात लोखंडी सुरा घेऊन त्यांच्या पोटात व पाठीत दोन ठिकाणी सुरा भोसकून ठार मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.