Danish Kaneria: संधी मिळाल्यास मलाही अयोध्याला जायला आवडेल – दानिश कानेरिया

Danish Kaneria: I would love to go to Ayodhya if I get the chance - Danish Kaneria हिंदू असल्यामुळे संघातील काही सदस्य दानिश सोबत जेवण्यासही कचरत होते असं अख्तर म्हणाला होता.

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाच ऑगस्ट रोजी अयोध्येत राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडला. पाकिस्तानचा क्रिकेटपटू दानिश कानेरियाने यांनी आपला आनंद व्यक्त करत प्रभू श्रीराम यांचं मंदिर बनणं ही समस्त हिंदूंसाठी अभिमानाची गोष्ट असल्याचं म्हटलं होतं.

दानिशने ट्विटर अकाऊंटवर याबाबत बोलताना म्हटले आहे की, संधी मिळाल्यास अयोध्येला जाऊन श्रीरामाचं दर्शन घेण्याची माझी इच्छा आहे. मी एक निस्सिम हिंदू असून प्रभू श्रीरामांनी दाखवलेल्या रस्त्यावर चालण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो.

शोएब अख्तरनं केलेल्या एका वक्तव्यामुळे दानिश कानेरिया चर्चेत आला होता. हिंदू असल्यामुळे संघातील काही सदस्य दानिश सोबत जेवण्यासही कचरत होते असं अख्तर म्हणाला होता. परंतु, त्यानंतर त्यानं आपलं वक्तव्य चुकीच्या पद्धतीनं माध्यमांसमोर आल्याचंही त्यानं म्हटलं होतं.

दरम्यान, राम मंदिराच्या भूमी पूजनानंतर दानिश कानेरिया याने आनंद व्यक्त करत. आज जगभरात आनंदाचे वातावरण असून ही फार समाधानकारक बाब असल्याचे म्हटले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.