Dapodi : ‘सीएमई’मधून बाभळीची झाडे तोडून नेल्याप्रकरणी 13 जणांना अटक

एमपीसी न्यूज – मिलिटरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीएमई) परिसरातून पाच बाभळीची झाडे तोडून टेम्पोत भरून चोरी केल्याप्रकरणी 13 जणांना अटक करण्यात आली आहे. हा प्रकार रविवारी (दि. 9) सायंकाळी सहा वाजता मीनाताई ठाकरे शाळेच्या मागील बाजूला सीएमईच्या कंपाउंडच्या आतमध्ये घडली.

नफीज सलीम शेख (वय 36), नफीज अब्दुल खालिद (वय 30), मोहम्मद नन्हआ राशिद कुरेशी (वय 45), मोहम्म्द शहजाद कमरुद्दीन अब्बासरी (वय 22), मोहम्मद अब्दुल वाहिद शेख (वय 22), अनुवार नथू मलिक (वय 35), मोहम्मद आकिम कमाल काझी (वय 22, सर्व रा. ओटा स्कीम, निगडी), सागर रमेश सुरपाटणे (वय 27, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी), संतोष हरिश्चंद्र चौधरी (वय 20, रा. लांडेवाडी, भोसरी), रत्नेश रामलवट केवट (वय 25), सर्वेश कुमार रामलवट केवट (वय 22), सुनील कुमार छोटेलाल निषाद (वय 22, तिघे रा. काळभोर नगर, चिंचवड), सुरेंद्र रामशब्द यादव (वय 42, रा. दुर्गानगर, आकुर्डी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

दत्तात्रय सर्जेराव यादव (वय 43, रा. सीएमई, दापोडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून दापोडी येथील सीएमईच्या कंपाउंडची भिंत मीनाताई ठाकरे शाळेच्या मागच्या बाजूने क्रेनच्या साहाय्याने तोडली. ‘सीएमई’मध्ये अनाधिकाराने प्रवेश करून 25 हजार रुपये किमतीची पाच बाभळीची झाडे तोडली. कोणतीही परवानगी न घेता तोडलेली झाडे टेम्पोमध्ये भरून त्याची चोरी केली. पोलिसांनी 13 जणांना अटक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.