BNR-HDR-TOP-Mobile

Dapodi : दारू पिताना झालेल्या भांडणात तरुणावर चाकूने वार

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – दारू पीत असताना तरुणांमध्ये भांडण झाले. त्यात तरुणांनी एका तरुणावर चाकूने वार केले. तसेच त्याला मारहाण केली ही घटना दापोडी येथे घडली.

भारती परशुराम गायकवाड (वय 42, रा. बिबवेवाडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पापा शेख, शहरुख (पूर्ण नाव पत्ता माहीती नाही) आणि त्याच्या मित्रांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 एप्रिल रोजी रात्री दहा वाजता भारती यांचा मुलगा आणि त्यांचे मित्र दापोडी येथील सोनकांबळे रेल्वे बोगद्याजवळ दारू पीत बसले होते. दारू पीत असताना तरुणांनी भारती यांच्या मुलाला मारहाण केली.

तसेच त्याच्यावर चाकूने वार केले. यामध्ये त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.