Dapodi : बसमध्ये चढताना वृद्ध महिलेचे लाख रुपयांचे सोने चोरीला

एमपीसी न्यूज – बसमध्ये चढत असताना वृद्ध महिलेचे लाख रुपयांचे दागिने चोरल्याची घटना दापोडी (Dapodi) येथे गुरुवारी (दि.11) दुपारी साडे तीन वाजता घडली.

याप्रकरणी 63 वर्षीय महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Partition Remember : महापालिकेतर्फे फाळणीबाबतच्या छायाचित्रांचे प्रदर्शन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या दापोडी (Dapodi) येथे बसमध्ये चढत असताना अज्ञाताने त्यांच्या हातातील 25 ग्रॅम वजनाच्या 1 लाख रुपये किंमतीच्या सोन्याच्या पाटल्या चोरून घेतल्या. यावरून निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढिल तपास पोलीस करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.