Dapodi : भोसरी पोलिसांकडून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; तीन महिलांची सुटका

एमपीसी न्यूज – भोसरी पोलिसांनी दापोडी येथील एका घरामध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. यामध्ये पोलिसांनी तीन महिलांची सुटका केली. ही कारवाई मंगळवारी दुपारी पावणेसहाच्या सुमारास दापोडी मधील मंत्री निकेतन येथे करण्यात आली.

रेणू रमेश भाटिया (वय 63, रा. दापोडी), पेपसिंह शेतानसिंह (वय 25, रा. दापोडी, मूळ रा. राजस्थान), रमेश शिवाजी सूर्यवंशी (वय 27, रा. थेरगाव मूळ रा. लातूर), बंडू उत्तम चव्हाण (वय 25, रा. सुसगाव, मूळ रा. नांदेड), मारुती बळीराम शिंदे (वय 35, रा. रहाटणी मूळ रा. बीड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोडी मधील मंत्री निकेतन येथे एका घरामध्ये आरोपी तीन महिलांना वेश्या व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत असत. तसेच ग्राहकांकडून मिळणारे पैसे स्वतःच्या फायद्याकरिता घेऊन त्यावर आपली उपजीविका चालवत. याबाबत भोसरी पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी हा डाव उधळून लावला. यामध्ये तीन महिलांची सुटका करण्यात आली असून पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपी अद्याप फरार आहेत. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.