Dapodi : सायकल दुकानातील साहित्य जळून खाक

Burn the materials in the bicycle shop

एमपीसी न्यूज – दापोडी येथील एसटी वर्क शॉप रस्त्यावरील सायकल मार्टला आग लागली. यामध्ये दुकानातील साहित्य जळून खाक झाले आहे. ही घटना मंगळवारी (दि. 16) दुपारी एकच्या सुमारास घडली.आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोडी येथील एसटी वर्क शॉप रस्त्यावर ‘रघुवीर सायकल मार्ट’ आहे. दुपारी एकच्या सुमारास या ठिकाणी आग लागल्याची माहिती पिंपरी चिंचवड अग्निशमन विभागाला मिळली.

त्यानुसार अग्निशमन विभागाचे दोन बंब तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तब्बल अर्ध्या तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.

मात्र, तोपर्यंत दुकनातील फर्निचर, सायलचे पार्ट आदी वस्तू जाळून खाक झाल्या होत्या.

भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.