Dapodi : कारच्या धडकेत चौघे जखमी

एमपीसी न्यूज – एका कारने धडक दिल्याने चार जण जखमी झाले. ही घटना रविवारी (दि. 13) दुपारी दापोडी येथे घडली.

सिध्दार्थ कांबळे (वय 22), अतुल निर्भावे (वय 19, दोघेही रा. पिंपळे गुरव) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. तर इतर दोघांची नावे समजू शकली नाहीत.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास एम एच 12 / 3610 (कारचा पूर्ण क्रमांक माहिती नाही) या कार चालकाने फुगेवाडी दापोडी पुलावर दुचाकीवरील दोन जणांना धडक दिली. यामुळे दुचाकीवरील त्या दोन तरुणांनी कार चालकाला चोप दिला. यामुळे घाबरून पळ काढलेल्या कार चालकाने दापोडीत आणखीन एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात सिद्धार्थ आणि अतुल हे दोघे जखमी झाले. अपघातानंतर कार चालक कारसह पळून गेला. याबाबत भोसरी पोलिसांकडे सायंकाळी उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झाला नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.