Dapodi : दापोडीत रंगणार गारेगार कवी संमेलन

एमपीसी न्यूज  – भर उन्हात कलिंगडाचा आस्वाद घेता- घेता कविता सादर करायची, या आगळ्यावेगळ्या संकल्पनेवर आधारित गारेगार कवी संमेलन शब्दधन काव्यमंचाच्या वतीने दापोडी येथे रंगणार आहे.

दापोडी-पिंपळेगुरव रस्त्यावर काटे पेट्रोल पंपाशेजारी दि. 26मे तारखेला दुपारी दीड वाजता हे कवी संमेलन होणार आहे.

  • कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी कवियित्री वर्षा बालगोपाल असणार आहेत. तर सूत्रसंवादक  कवी राज अहेरराव करणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.