Dapodi : आई-वडिलांचा सांभाळ न करता त्यांना मारहाण करणा-या मुलावर गुन्हा

एमपीसी न्यूज – वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ न करता त्यांना वेळोवेळी मारहाण करणा-या मुलावर आईने पोलिसात गुन्हा नोंदवला. ही घटना सोमवारी (दि. 1) दुपारी एकच्या सुमारास जयभीमनगर, दापोडी येथे घडली.

विकी रामचंद्र मारी (वय 38, रा. जयभीमनगर, दापोडी) असे गुन्हा दाखल झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकणी सगाई रामचंद्र मारी (वय 65) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सगाई आणि त्यांचे पती रामचंद्र ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांना वयोमानानुसार शरीराची हालचाल करता येत नाही. त्यांचा सांभाळ विकी करीत नाही. तसेच तो वारंवार आई-वडिलांना त्रास देतो. सोमवारी दुपारी त्याने बहिणीच्या घरात घुसून बहिणीला मारहाण केली.

तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. बहिणीच्या घराच्या दरवाजावर कोयत्याने मारून तो तोडण्याचा प्रयत्न केला. तसेच परिसरात दहशत पसरवली. याबाबत सगाई यांनी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.