Dapodi Crime : किरकोळ कारणावरून एकाला लोखंडी मापाने मारहाण

एमपीसी न्यूज  – किरकोळ कारणावरून दुकानातील धान्य भरण्याच्या लोखंडी मापाने एकास बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना 17 जुलै रोजी शितळादेवी चौकदापोडी (Dapodi Crime) येथे घडली.

मयूर मधुकर काळोखे (वय 33रा. देहूगाव) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी गुरुवारी (दि. 21) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तुषार सत्यविजय हेडात्याची पत्नी आणि तीन अनोळखी कामगारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dehuroad : व्यवसायात भागीदारी करणे पडले महागात

पोलिसांनी दिलेली माहितीनुसारफिर्यादीत्यांचे भाऊ आणि अन्य फ्लॅट धारक हे आरोपी तुषार हेडा याने मिटिंगसाठी बोलावल्याने गेले. त्यावेळी तुषार याने फिर्यादी यांना तू फ्लॅट धारकांना सोबत घेऊन का आलाअसे म्हणून धान्य भरण्याच्या लोखंडी मापाने मारून जखमी केले. तुषार याच्या पत्नीने शिवीगाळदमदाटी केली. आरोपीच्या दुकानातील तीन कामगारांनी फिर्यादी आणि त्यांच्या सोबत आलेल्या लोकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात फिर्यादी यांचा मृत्यू होण्याची शक्यता होतीअसे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.