Dapodi Crime News : घरात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करत दिली धमकी

एमपीसी न्यूज – घरात अल्पवयीन मुलगी एकटी असताना आरोपीने घरात घुसून तिच्याशी गैरवर्तन (Dapodi Crime News) केले. हा प्रकार बुधवारी (दि.25) दापोडी येथे घडला आहे.

याप्रकरणी पिडित मुलीच्या आईने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गणेश शिंदे (रा. दापोडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune News : श्री साई सेवा संस्था च्या गतीमंद मुलांनी साजरा केला प्रजासत्ताक दिन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी घरात एकटी असताना आरोपी घरात आला व त्याने पिडीतेशी गैरवर्तन केले. तसेच याबद्दल कोणाला सांगितले किंवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली तर दोन्ही भावांना मारून टाकण्याची धमकी दिली.यावरून भोसरी पोलिसांनी आरोपी विरोधात बाल लैंगीक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत (Dapodi Crime News) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.