_MPC_DIR_MPU_III

Dapodi crime News : अल्पवयीन मुलीसह तिच्या आईसोबत गैरवर्तन; एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – महिलेचा पाठलाग करून अश्लील शेरेबाजी करत तिचा विनयभंग केला. तिच्याशी गैरवर्तन करत असताना मध्ये आलेल्या तिच्या अल्पवयीन मुलीसोबत देखील गैरवर्तन करून तिचाही विनयभंग केला. याबाबत एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 15 ते 28 डिसेंबर या कालावधीत दापोडी येथे घडला.

_MPC_DIR_MPU_IV

किशोर देवकुळे (वय 45, रा. दापोडी) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा आरोपीने वारंवार पाठलाग केला. महिलेला अश्लील शब्दात बोलून, शेरेबाजी करून तिचा विनयभंग केला.

_MPC_DIR_MPU_II

सोमवारी (दि. 28) दुपारी साडेपाच वाजता पुन्हा आरोपीने फिर्यादी महिलेचा हात धरून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी आईला आरोपीच्या ताब्यातून सोडविण्यासाठी फिर्यादीची अल्पवयीन मुलगी आली. आरोपीने अल्पवयीन मुलीसोबत देखील अश्लील कृत्य करत तिचाही विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

 

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.