Dapodi crime News : जुन्या भांडणाच्या रागातून तरुणास मारहाण

एमपीसी न्यूज – पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणास लाकडी दांडक्‍याने मारहाण करण्यात आली. ही घटना दापोडी येथे शनिवारी (दि. 3) रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली.

विकी करमसिंग बहाद्दूर (वय 32, रा. सटवाई देवी मंदीराजवळ, दापोडी) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सागर कांबळे (वय 31, रा. एसएमएस कॉलनी, दापोडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी विकी हे दापोडीतील एसएमएस कॉलनी येथे आले होते. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपी कांबळे याने पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादी बहाद्दूर यास शिविगाळ करीत लाकडी दांडक्‍याने मारहाण केली.

या मारहाणीत बहाद्दूर हे जखमी झाले आहेत. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.