Dapodi Crime News : महिलेच्या विनयभंगप्रकरणी सात जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – महिलेच्या घरच्या गेटवर बेकायदेशीरपणे जमाव जमवून महिलेशी गैरवर्तन करत तसेच शिवीगाळ करून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 12) दुपारी दापोडी स्मशानभूमीसमोर घडली.

सनी गायकवाड, विकी गायकवाड, जय गायकवाड आणि त्यांच्या तीन ते चार साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी बेकायदेशीरपणे फिर्यादी यांच्या घराच्या गेटवर जमाव जमवला. फिर्यादी यांचे दीर व पुतण्या कोठे आहेत, अशी विचारणा करत आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या मुलीला केसांना पकडून ढकलून दिले.

शिवीगाळ करत फिर्यादी यांच्याशी गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला. तसेच आरोपींनी फिर्यादी यांना बघून घेण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.