_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Dapodi Crime News : पूर्ववैमनस्यातून कोयत्याने वार करून तरुणाला लुटले; दोघांना अटक

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणावर कोयत्याने वार केले आणि त्यानंतर त्याच्याकडील रोख रक्कम जबरदस्तीने काढून चोरून नेली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना दापोडी येथे बुधवारी (दि. 12) रात्री घडली.

साहिल काची ऊर्फ वाल्मिकी (रा. फुगेवाडी), विक्रम ऊर्फ विकी महेंद्र यादव (वय 24), प्रितम ऊर्फ पित्तू यादव (वय 24, दोघेही रा. दापोडी) आणि दुचाकीवरील अनोळखी व्यक्‍ती अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. विक्रम आणि प्रितम या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत नईम सलीम शेख (वय 26, रा. पवार वस्ती, दापोडी) यांनी गुरुवारी (दि. 13) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांचे यापूर्वी भांडण झाले होते. ते भांडण मिटवून घेऊ असे सांगत आरोपींनी फिर्यादी यांना सोबत येण्यास सांगितले. फिर्यादी नईम हे आरोपींसोबत गाडीवर जात असताना त्यांना आरोपींजवळ कोयता आणि बांबू असल्याचे दिसले.

यामुळे नईम यांनी गाडीवरून खाली उतरून आपल्या घराकडे पळ काढला. त्यानंतर आपली गाडी घेऊन ते पोलीस चौकीकडे जात असताना दापोडीतील विनियार्ड चर्चजवळ आरोपींनी फिर्यादी यांना अडविले. नईम यांना बांबूने मारहाण करीत कोयत्याने हातावर वार करून जखमी केले. तसेच फिर्यादी यांच्या खिशातील 500 रुपये जबरदस्तीने काढून घेतले.

भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.