Dapodi Crime News : हटकले म्हणून रिक्षा चालकाचा खून

एमपीसी न्यूज – रस्त्यावर उभ्या केलेल्या रिक्षात काहीजण बसलेले (Dapodi Crime News) असताना रिक्षा चालकाने त्यांना हटकले. यावरून झालेल्या वादात रिक्षा चालकाच्या डोक्यात सिमेंट गट्टू घालून खून करण्यात आला. ही घटना रविवारी (दि. 19) गणेशनगर, दापोडी येथे घडली.

अलीम इस्माईल शेख (वय 45, रा. कृष्णानगर, पिंपळे गुरव) असे खून झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे.

 

Vadgaon Maval : पीडीसीसी बँक सेवक पतसंस्थेच्या उपाध्यक्ष पदी चंद्रकांत ढोरे

मिळालेल्या माहितीनुसार, शेख यांची रिक्षा आहे. रविवारी सायंकाळी ही रिक्षा गणेशनगर येथे रस्त्यालगत उभी केली होती. या रिक्षात काहीजण बसलेले असताना शेख यांनी त्यांना हटकले. याचा राग आल्याने रिक्षात बसलेल्या आरोपीने शेख यांना सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी (Dapodi Crime News) ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.