Dapodi crime News : एसटी वर्कशॉपजवळ सापडले कुजलेल्या अवस्थेतील अर्भक

एमपीसी न्यूज – सांगवी -दापोडी रोडवरील एसटी वर्कशॉपच्या जवळ कुजलेल्या अवस्थेतील एक अर्भक सापडले. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी (दि. 19) दुपारी उघडकीस आली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोडी येथील एसटी वर्कशॉपच्या जवळ एक मृत अर्भक असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मंगळवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी अर्भकाचे पाय आणि शरीराचा काही भाग कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.

_MPC_DIR_MPU_II

मिळालेल्या अवयवांवरून मयत अर्भक हे स्त्री आहे की पुरूष हे समजू शकले नाही. मिळालेले अवयव शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. त्यानंतर हे अर्भक किती दिवसांचे आहे आणि किती दिवसांपूर्वी टाकून दिले आहे, याबाबतची माहिती मिळेल, असे पोलीस निरीक्षक अवताडे यांनी सांगितले.

भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.