Dapodi : सात वर्षीय मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ; चिमुरडीवर अनैसर्गिक कृत्य केल्याचा संशय

एमपीसी न्यूज – सात वर्षीय मुलीचा संशयास्पद अवस्थेतील मृतदेह आढळल्याने दापोडी परिसरात खळबळ उडाली आहे. या चिमुरडीवर अनैसर्गिक कृत्य करून तिचा खून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ही घटना आज सकाळी घडली. घटनेनंतर अज्ञात आरोपी फरार झाला असून चिमुरडीचा मृतदेह वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलीची आई कामासाठी आणि मोठी बहीण शाळेत गेल्यानंतर मुलगी घरी एकटीच होती. अज्ञात नराधमाने तिच्यावर अनैसर्गिक कृत्य केले. तसेच तिचा गळा दाबून खून केला. आई कामावरून घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. भोसरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.